लातूर : प्रतिनिधी
राज्यातील खाजगी साखर उद्योगात मराठवाडा आणि विदर्भ राज्यात एफ. आर. पी. पेक्षा अधिक भाव देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीज या कंपनीला विस्मा वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सर्वोत्तम तांत्रिक संचालन व नवीनतम कार्य टेक्निकल हा मानाचा प्रथम पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. त्याबद्दल सोमवारी रेणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकुर देशमुख, व्हाईस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील, माजी चेअरमन तथा संचालक आबासाहेब पाटील, माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, माजी चेअरमन तथा संचालक सर्जेराव मोरे यांच्यासह कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संभाजी रेड्डी, चंद्रकांत सुर्यवंशी, तानाजी कांबळे, तुकाराम कोल्हे, शंकरराव पाटील, सतीश पवार, गोविंद पाटील, रणजित पाटील, बालाजी हाके, पंडितराव माने, स्नेहलराव देशमुख, चंद्रचुड चव्हाण, नरसिंग इंगळे, कार्यलक्षी संचालक आण्णासाहेब पाटील, तक्रार निवारण समिती सदस्य उमाकांत देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, सचिव रविशंकर बरमदे आदी उपस्थित होते.
















