22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजामोदमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा

जामोदमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा

जळगाव : प्रतिनिधी
गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पुण्यासह काही ठिकाणी अजूनही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.

ढोल-ताशाच्या गजरात भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप देत असताना बुलडाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एक अप्रिय घटना घडली. विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. त्यामुळे जळगाव जामोद शहरात तणाव निर्माण झाला आहे.

गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मोठा राडा झाला. दगडफेकीची घटना घडली. जळगाव जामोदमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पण जामोदमधील विसर्जन मिरवणूक अजूनही पूर्ण झालेली नाही.

आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन करणार नाही, अशी १८ गणेश मंडळांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे १२ तास उलटून गेल्यानंतर गणेश मूर्तींचे विसर्जन झालेले नाही. बुलडाण्यात जळगाव जामोद येथे विसर्जन मिरवणूक सुरू असताना दगडफेकीची घटना घडली. काही समाजकंटकांनी हे कृत्य केले. तणाव इतका वाढला की, पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात काही महिला जखमी झाल्या आहेत. गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR