जीएनएम प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

परभणी : इंदिरा नर्सिंग महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या ॠठट प्रथम वर्षाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हाटसअपद्वारे प्रसारित झाल्याच्या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक असल्यास संबंधित पेपरची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी महानगराच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अभाविपच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचेही समोर आले आहे. प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू असतानाच बाहेर प्रसारित होणे ही परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयतेवर, पारदर्शकतेवर आणि विद्यार्थ्यांना मिळणा-या समान संधीवर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे अभाविपने म्हटले आहे. प्रश्नपत्रिका कोणत्या वेळी छायाचित्रित करण्यात आली.

ती प्रथम कोणाकडे पाठविण्यात आली आणि कोणत्या व्हाटसअप क्रमांकांवर अथवा गटांमध्ये प्रसारित झाली याची सायबर फॉरेन्सिक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जप्त मोबाईल, व्हाटसअप चॅट, कॉल रेकॉर्ड, डिजिटल डेटा, परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज, परीक्षा कक्षातील उपस्थितीपत्रक, प्रश्नपत्रिका वितरणाची नोंद व पंचनामा यांसारखे सर्व महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवावेत. संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता, पर्यवेक्षकांची नियुक्ती, प्रश्नपत्रिका ठेवण्याची व वितरणाची पद्धत तसेच परीक्षा केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अभाविपने दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत, तपासाची सद्यस्थिती, प्रशासकीय कारवाईबाबत लेखी माहिती देण्याची मागणीही केली आहे. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगर मंत्री गायत्री लाड, जिल्हा संयोजक दर्शन देशमुख, महेश बडवे, हरीश मोरे यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:18:26
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35

Latest news