लातूर : प्रतिनिधी
जेईई-अडव्हान्स-२०२६ परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. संस्थेतील पीसीएम ग्रुपचे २०५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. प्राप्त निकालापैकी ५० विद्यार्थ्यांनी (एआयआर) ऑल इंडिया रँक प्राप्त केले
आहेत.
आयआयटी, आयआयएसटी, आयआयएससी, आयआययसईआर इत्यादी राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालयात प्रवेशासाठी जेईई-अडव्हान्स-२०२६ ऑनलाईन (सीबीटी) परीक्षा १७ मे २०२५ रोजी दोन सत्रात देशात एकाचवेळी घेण्यात आली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या महाविद्यालयातून वास्तवसिंह नारायणराव वडणे कॉमन रँक लिस्टमध्ये ३०९१ रँक व आर्थिक दुर्बल घटकामधून ३५७ रँक घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तनिष्का उमेश इंगळे ही (सीआरएल) ४५४५ व अनुसूचित जाती संवर्गातून (सीआरएल) एस्सी रँक ८७ व महाविद्यालयातील मुलीतून सर्वप्रथम, कृष्णा विष्णू घोडके (सीआरएल) ४९००६ व आर्थिक दुर्बल घटकामधून इडब्ल्यूएस रँक लिस्ट ५८२, अंतरिक्ष बालू जाधव (सीआरएल) ५२१७ व इतर मागास संवर्गातून ओबीसी-एनसीएल रँक लिस्ट ११३८ रँक प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. दिव्यांग संवर्गातून सत्यजित विलास शिंदे या विद्यार्थ्याने ३१६ रँक प्राप्त केला आहे. यावर्षी महाविद्यालयातून जवळपास ३६ विद्यार्थ्यांना भारतातील प्रख्यात आयआयटी व २८ विद्यार्थ्यांना एनआयटी, आयसर व बिटस् या महाविद्यालयामध्ये हमखास प्रवेश मिळू शकतो.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव बी. बी. ठोंबरे, सहसचिव डॉ. शिवाजीराव सुर्यवंशी, सहसचिव उद्धवराव पाटील व इतर सर्व संचालक, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने, समन्वयक सुरेश तांबडे, व आयआयटी बॅचचे समन्वयक प्रा. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
















