36.7 C
Latur
Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रझिरवाळांसाठी माजी मंत्र्यांनी लावला सापळा

झिरवाळांसाठी माजी मंत्र्यांनी लावला सापळा

सपकाळांचा धक्कादायक दावा

मुंबई : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ट्रान्सवूमनसोबतचा आक्षेपार्ह व्हीडीओ समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, झिरवाळ यांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, ‘झिरवाळांची जागा रिकामी करून घेण्यासाठी एक मोठे नाव समोर येत आहे. सरकारमधील एक माजी मंत्री आहे. तोच हे सगळं करतो आहे. जर झिरवाळांची जागा खाली झाली तर त्याची एन्ट्री होईल, असा सगळा प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे.’

‘जे नको आहेत ते टार्गेट होत आहेत. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसलाय. त्यामुळे दुस-याची विकेट काढायला तिसरा लाईनमध्ये आहेच. अशामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे’, असे देखील ते म्हणाले.

‘मी कालच म्हटले होते की पेन ड्राईव्ह समोर आला तर किमान तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील. व्हीडीओ पुढे आले तर ते पदावर राहू शकणार नाहीत. चाकणकरांनी पाय धुतले तर आपण त्यांना काढून टाकले. पण त्यांच्यापेक्षाही विचित्र क्लिप त्या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. ते केवळ मोबाईल दाखवतायेत, लॅपटॉप दाखवतायेत. पण ते पेन ड्राईव्ह लपवत आहेत. सोयीचं जेवढं आहे तेवढंच काढून कारवाई सुरू आहे’, असा दावा देखील त्यांनी अशोक खरात प्रकरणात केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR