31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरटंचाई सदृश्य गावात चारा व पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून अत्यंत सुक्ष्म नियोजन

टंचाई सदृश्य गावात चारा व पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून अत्यंत सुक्ष्म नियोजन

सोलापूर-
यावर्षी आपल्या जिल्ह्यात निवडणुकांच नाहीतर तर दुष्काळी स्थितीही भयानकच असल्याने जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ३८ गावात पाणीच उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी ४२ पाण्याचे टैंकर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, आता उजनीसह इतर साठवण तलावातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी खालावू लागली आहे. यामुळे आहे त्या पाण्याचा वापर काटकसरीने करून ३० जूनपर्यंत हा पाणीसाठा
जाण्याचे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाणी साठ्याची सद्यस्थिती पाहिली तर उजनी धरणात वजा ३७.०९%, सात मध्यम प्रकल्पात १०.९९%, ५६ लघु प्रकल्पात २.६८% तर ९० कोल्हापूर बंधाऱ्यात १८.६७% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने टंचाईच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. राज्य शासनाने टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत आहे. टंचाई सदृश्य गावात चारा व पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून अत्यंत सुक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या १६ शासकीय टैंकरपैकी १२ टैंकरला वाहनचालक उपलब्ध नाहीत. यामुळे या शासकीय टैंकरसाठी मानधन तत्त्वावर अथवा शासनाने विहित केलेल्या पद्धतीनुसार वाहन चालक लवकर भरणार आहोत. यामुळे खाजगी १२ टैंकर कमी होवून शासनाचा पैसा वाचणार आहे.असे महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगीतले.

यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक आहे. आपल्या जिल्ह्याचा तापमानाचा टक्का (४३ अंशाच्या पुढे) इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे सकाळी ११ नंतर आणि दुपारी ४ पर्यंतच्या कडक उन्हात शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांनी काम करू नये. यामुळे उष्माघाताची भीती असते. शहरातील नागरिकांनीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये. जनावरांनाही सावलीत बांधावे, पशुपक्षांसाठी सर्वांनीच पानवठे उभारावेत.असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगीतले.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाई सदृश परिस्थिती आहे. उजनी धरणात वजा ३७.०९% पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाने जून २०२४ अखेरपर्यंत पाणी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलेले आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमध्ये चार कोटी पन्नास लाख रुपयांचे चारा बियाणे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून दिलेले आहे. यातून बियाणे खरेदी करून ज्वारी, बाजरा व मका चारा उपलब्ध होत असून, जुलै २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यात चारा उपलब्ध राहणार आहे. तसेच जिल्हा बाहेर चारा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले.

टैंकरची मागणी आल्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी व उपअभियंता पाणीपुरवठा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याविषयी तात्काळ निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर टंचाई उपाययोजना राबवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केलेले असून, तालुका स्तरावर ही जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी यंत्रणांकडून व्यवस्थितपणे केली जात आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, कोणत्याही सांगोला या तीन तालुक्यात गंभीर गावातून पाण्याच्या तर करमाळा व माढा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला असून जिल्ह्यातील इतर सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली ५५ महसुली मंडळात ही दुष्काळ आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR