27 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeनांदेडट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नांदेड : भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड शहरात घडली. शहरातील छत्रपती चौकातून वेगात जाणा-या आयशर ट्रकने एका दुचाकी चालकास धडक दिली.

यात दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २३ रोजी दुपारीच्या सुमारास घडली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात पाठविला आहे. दरम्यान मयताची अद्याप ओळख पटली नाही, असे भाग्यनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कुकडे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR