32.1 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeलातूरडॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली 

डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली 

लातूर : प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने डॉ. काळगे यांच्या पाठीशी उभे राहून विजयासाठी सक्रीय झाले आहेत. डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली आहे, त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. डॉ. काळगे यांचे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ब्रीदवाक्य आहे. त्यांना यालोकसेवेसाठी आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी ग्रामदैवताचे दर्शन घेतले असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी सहपत्नीक डॉ. सविता शिवाजी काळगे यांच्यासह लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली व उमेदवारी अर्ज प्रारंभक पूजन केले या प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहराध्यक्ष राजा मनियार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर महानगर प्रमुख सुनील बसपुरे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अमर खानापुरे, माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, सपना किसवे, गोरोबा लोखंडे, प्रा.प्रवीण कांबळे, पृथ्वीराज शिरसाट, डॉ. हनमंत किनिकर, डॉ. सतीश बिराजदार डॉ. पोळ, डॉ. दाताळ, डॉ. संजय शिवपुजे, डॉ. हंडरगुळे, डॉ. दीपक गुगळे, डॉ.अशोक पोद्दार, अशलेश मोरे, रविशंकर जाधव, दगडूआप्पा मिटकरी, सुपर्ण जगताप, देविदास बोरुळे पाटील, अविनाश बट्टेवार, करीम तांबोळी, सुधीर गोजमगुंडे, सुलेखा कारेपूरकर, चंद्रकांत धायगुडे, राज क्षीरसागर, अशोक भोसले, डॉ.अजय जाधव, डॉ. छाया महाजन, डॉ. रवींद्र जळकोटे, संजय वारद, डॉ. राजेश दरडे, डॉ. ओम कानडे, डॉ. शशी पाटील, रविशंकर जाधव, धनंजय शेळके, हरिभाऊ गायकवाड,  आदींसह काँग्रेसचे व महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपण सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिरात आलो आहोत. लोकसेवेसाठी आशीर्वाद प्राप्त व्हावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. इंडिया आघाडीचे मित्रपक्ष ही या कामाला लागले आहेत. सर्वांनी डॉ. काळगे यांच्या पाठीशी उभे राहावे. डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी सामान्य माणसाने उचलून धरलेली आहे, त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे, डॉ. काळगे यांचे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ब्रीदवाक्य आहे, त्यांना आम्ही महाविकास आघाडीचे उद्याचे नेते म्हणून पाहतो  असे ते म्हणाले.
आपण सर्वांनी मला साथ द्यावी, आपला विजय निश्चित आहे
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, या मंदिरात उमेदवारी अर्ज स्वाक्षरीत केला आहे. देवाचे आशीर्वाद मिळतील, आपण सर्वांनी मला साथ द्यावी, आपला विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.
लोकशाही डॉ. काळगे  यांना निवडून आणणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर महानगर प्रमुख सुनील बसपुरे म्हणाले की, लोकशाहीची पाळीमुळे बळकट करण्यासाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून आणणार आहोत. लातूर शिवसेना महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून काम करील आहे असे त्यांनी सांगितले.
जुलमी राजवट दूर करण्यासाठीडॉ. काळगे यांना विजयी करावे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर शहराध्यक्ष राजा मणियार म्हणाले की, ही महाविकास आघाडी घट्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जुलमी राजवट दूर करण्यासाठी डॉ. काळगे यांना विजयी करावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR