40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeधाराशिवढोकी पोलिस ठाण्याच्या पथकाने पकडली कारसह ७ लाखांची दारू

ढोकी पोलिस ठाण्याच्या पथकाने पकडली कारसह ७ लाखांची दारू

धाराशिव : प्रतिनिधी
तेर ता. धाराशिव येथे एका कारमधून लाखो रूपयेकिंमतीची देशी-विदेशी दारू अवैध विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती ढोकी पोलीसांना बुधवारी दि. ८ मे रोजी रात्री मिळाली होती. यावरून पोलीसांनी पाळत ठेवून कारची तपासणी केली असता त्यामध्ये लाखो रूपये किंमतीची दारू आढळून आली. यावेळी पोलिस पथकाने कारसह ७ लाखाची दारू जप्त केली आहे. आरोपी दिपक विठ्ठल नाईकवाडी रा. तेर याला अटक केली आहे. या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कळंब ते ढोकी रस्त्यावरून एक सिल्वहर कलरची कार दारू घेऊन येत असल्याची माहिती ढोकी पोलिसांना मिळाली होती. ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तिगोटे यांनी पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व कळंबचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सापळा लावला होता.

यावेळी कार घेऊन तेर येथील दिपक नाईकवाडी आला. कारची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपनीची देशी-विदेशी लाखो रूपये किंमतीची दारू दिसून आली. पोलीसांनी कारसह ६ लाख ९८ हजार ४१० रूपयेकिंमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी तेर येथील दिपक विठ्ठल नाईकवाडी याच्या विरोधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तिगोटे, सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते, उत्रेश्वर गुंड, श्रीमंत क्षीरसागर, श्रीधर नांदे यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR