लातूर : प्रतिनिधी
येथील मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटर चे अध्यक्ष सुप्रसिध्द तबलावादक तालमणी डॉ. राम बोरगावकर यांना विश्वकर्मा ग्रामीण शैक्षणिक विकास संस्था विष्णुपुरी, नांदेड आणि एन.आर.डी. फूड प्रॉडक्ट्स तपसे चिंचोली यांच्या वतीने कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतज्ञ तालमणी डॉ.राम बोरगावकर यांच्या संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल तसेच संगीत क्षेत्रातील साधना, संगीत कलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेले कार्य, यासोबतच अखंड संगीत यज्ञाच्या माध्यमातून उदयोन्मुख कलावंतांना घडविणा-या आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देणारे प्राचार्य डॉ.राम बोरगावकर यांना कलाभूषण पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, माजी कुलगुरू मधुकरजी गायकवाड, गोविंद नांदेडे, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के,डॉ. दिगंबर नेटके यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कलाभूषण  पुरस्कार वितरण सोहळा लातूर येथील दयानंद सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत येथे पार पडला.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील, अँड. दासराव शिरुरे, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्राचार्य बाबुराव जाधव, प्राचार्य निलेश राजेमाने, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्राचार्य डॉ. सुदाम पवार यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

