27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरथकबाकी वसुलीसाठी ठोकले सील

थकबाकी वसुलीसाठी ठोकले सील

लातूर : प्रतिनिधी
कराची थकबाकी न भरणा-या आस्था संकुल या आस्थापनेस मनपाच्या पथकाने सोमवारी दि. १८ मार्च रोजी सील ठोकले. एमआयडीसी परिसरातील सहा अ ६- १६२ या ठिकाणी असणा-या आयटी पार्कमध्ये आस्था संकुल आहे. येथे केशवराज ज्युनिअर कॉलेज चालवले जाते .या मालमत्ता धारकाकडे १३  लाख ९ हजार ८२१ रुपये कर थकलेला आहे. नोटीसा देऊनही कर भरणा करण्यात न आल्याने मनपाच्या पथकाने केशवराज ज्युनिअर कॉलेजचे कार्यालय सोमवारी सील केले.
मनपाचे पथक प्रमुख समाधान सूर्यवंशी, कर निरीक्षक प्रदीप जोगदंड,जे. एम. ताकपिरे, सहाय्यक पथक प्रमुख चंद्रकांत बावगे, वसुली लिपीक संतोष फीसके, संतोष कुरकुट आदींनी या कारवाईत सहभागी घेतला.आणखी एका कारवाईत मनपाचे पथक सील लावण्यास गेले असता संबंधित मालमत्ता धारकाने थकीत करापोटी ७ लाख रुपयांचा धनादेश मनपाच्या पथकाकडे सुपूर्द केला. ज्या मालमत्ता धारकांकडे कर थकलेला आहे, अशांनी आपला थकीत कर लवकरात लवकर भरुन सहकार्य करावे. जप्तीची, मालमत्ता सील करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR