30.3 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमुख्य बातम्यादिल्लीतील धक्क्यामुळे पंजाबला हादरे; ‘आप’आमदारांची बैठक

दिल्लीतील धक्क्यामुळे पंजाबला हादरे; ‘आप’आमदारांची बैठक

चंदिगड : वृत्तसंस्था
दिल्लीत ‘आप’चा मोठा पराभव झाला. भाजपाला मोठं यश मिळाले असून सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल ऍक्शनमोडवर आले आहेत. केजरीवाल यांनी पंजाबमधील आमदारांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ११ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील आमदारांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे. यामुळे पंजाबमध्ये सोमवारी होणारी कॅबिनेट मिटींग स्थगित केली आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आमदारांशी केलेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

‘आप’च्या संयोजकांनी बोलावलेली बैठक देखील महत्त्वाची आहे, कारण पंजाबच्या आमदारांच्या कारभारावर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीची सत्ता हातातून गेली आहे. अशा परिस्थितीत पक्षाची संपूर्ण जबाबदारी पंजाबवर आहे. राजकीयदृष्ट्या, आम आदमी पक्षाला पंजाबमध्येही सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता अरविंद केजरीवाल अ‍ॅक्शनमोडवर आले आहेत.

‘आप’ फुटल्याचा दावा
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसने पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याचा दावा केला आहे. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल आता पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पंजाबला मध्यावधी निवडणुकांची तयारी करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी आपचे प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी मोठे विधान केले होते. पंजाबचा मुख्यमंत्री देखील हिंदू असू शकतो आणि मुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती पात्र असली पाहिजे आणि त्याला हिंदू किंवा शीख या दृष्टिकोनातून पाहू नये, असे विधान त्यांनी केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR