एक्झिट पोल, आप बॅकफूटवर येण्याचा अंदाज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले. येत्या शनिवारी ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल समोर येणार आहे. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेमधून एक्झिट पोलचे अंदाज समोर आले असून, त्यानुसार दिल्लीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला ३५ ते ४० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर आपला ३२ ते ३७ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला शून्य ते केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार आपला २५ ते २८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला २ ते ३ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे तर भाजपला या निवडणुकीत ३९ ते ४४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीत खरी लढत आम आदमी पार्टी अर्थात आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. आपने या निवडणुकीत आपले अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर भाजप आणि काँग्रेसने देखील प्रचंड ताकद लावली. याशिवाय बसपा आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने देखील काही जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळे या निवडणुकीला प्रचंड रंगत आलेली बघायला मिळाली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाची एकहाती सत्ता येईल, असे वातावरण नाही.
एक्झिट पोल
संस्था भाजप आप कॉंग्रेस
मॅट्रिज ३५ ते ४० ३२ ते ३७ ०१
चाणक्य ३९ ते ४४ २५ ते २८ २ ते ३