दुष्काळ धोरणाचे नुसतेच कागदी घोडे

लातूर : एजाज शेख
लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतमजूर आणि ऊसतोड मजुरांना बसत आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतात रोजगार मिळेनासा झाला आहे. परिणामी, पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांना गाव सोडून लातूर जिल्ह्याबाहेर किंवा शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे महागाईचा जबरदस्त मार, त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण आणि आता शहरी भागातही जगण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाच्या बैठकावर बैठका होत आहेत. अहवालावर अहवाल तयार होत आहेत. परंतु, दुष्काळ धोरण काही पुढे सरकेना आणि कागदी घोडे नाचवणे थांबेना, अशी वास्तव परिस्थिती आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने ज्या दिवशी दुष्काळ जाहीर केला त्या दिवसापासून लातूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी विशेष: लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, रोजगार हमी योजना, जिल्हा नियोजन, पुरवठा, कृषी, पाणीपुरवठा आदी सर्वच विभागातील अधिकारी दुष्काळ निवारणाच्या कामाला लागले आहेत. दिवसरात्र एकच काम दुष्काळ निवारण. त्यासाठी बैठकांवर बैठका, अहवालांवर अहवाल, विविध खात्यांच्या मंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स, असा सगळा दिखावा सतत सुरु आहे. नुसता कागदोपत्री मेळ घालणे की, वेळ घालवणे त्यांनाच ठाऊक. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारणासंदर्भात ज्या ज्या गोष्टी सांगीतल्या त्यातली एकही गोष्ट अद्याप दुष्काळग्रस्तांपर्यंत पोचली नाही.
गावात, शेतात कामच नसल्यामुळे या शेतक-यांना, शेतमजूरांना आणि इतर मजुरांना रोजगार हमीच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतातच काम द्या, असे सरकारकडून सांगण्यात येते. मात्र लातूरच्या रोजगार हमी योजना कार्यालयाकडून मात्र अद्यापही शेतक-यांच्या शेतात रोजगार हमी योजनेची कामे सुरुेकेलेली नाहीत. गेल्या आठवड्यात बैठक झाली आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले. अद्यापतरी ही कामे सुरु झाली नाहीत. जवळपास सर्वच
विभागांमध्ये यापेक्षा वेगळे काही झाले असे नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44
Video thumbnail
Latur|लातूरच्या आंबेडकर पार्कवर खासगी वाहनांचे अतिक्रमण? भीमसैनिक आक्रमक; आंदोलनाचा इशारा
01:50
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख बिनविरोध
02:46
Video thumbnail
Latur District Bank Election 2026|धीरज देशमुख यांची लातूर जिल्हा बँकेत बिनविरोध निवड
01:31
Video thumbnail
Latur Crime News|शेकडो नागरिकांसमोर युवकावर कोयत्याने वार; औसा शहरात खळबळ
00:54
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा उत्सव | हल्ला मोहल्ला आणि भव्य नगरकीर्तन
04:43
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते ‘मिरा सारीज’चे थाटात उद्घाटन
03:33

Latest news