33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रदेशातील ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत

देशातील ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत

पुणे: प्रतिनिधी
देशातील ज्वलंत प्रश्‍नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. मते मागण्याचा अधिकारच नाही. अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सभा होतील, तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल अशी टिपण्णी त्यांनी केली काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पटोले यांनी पुण्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील. कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच कॉंग्रेसची गॅरंटी कार्डला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनतेने निवडणुक हातात घेतली आहे दबावतंत्राचा वापर केला जात आहे भाजपामध्ये नेते निर्माण होत नाहीत. त्यामुळे दबावतंत्राचा वापर करून आमचे नेते फोडले जात आहेत. असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR