नकारात्मक पब्लिसिटी देणा-यांवर यामीचा संताप

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री यामी गौतम धरने पेड निगेटिव्हिटीचा भांडाफोड करत, पैसे न दिल्यास नकारात्मक पब्लिसिटीची धमकी देणा-यांना खंडणीवजा पद्धतींचा आरोप लावला आहे. तिच्या मते, अशा व्यवहारांमुळे प्रामाणिक कामाचे अवमूल्यन होते. ‘धुरंधर’ संदर्भात तिने ही संस्कृती थांबवण्याची मागणी केली आहे.

तिने उद्योगातील बदलत्या वाईट पद्धतींवर आपला संताप व्यक्त केला आहे. तिने ‘पेड प्रमोशन्स’, ‘पेड-निगेटिव्हिटी’ आणि ‘हाईप प्री-पेड’ कल्चरबाबत खुली नोट लिहिली आहे. तिच्या या व्यथित पोस्टमुळे पुन्हा एकदा ‘प्रमोशन-नेपोटिझम-कल्चर’ या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. तिने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, काही लोक किंवा संस्थांकडून पैसे न दिल्यास चित्रपटाबद्दल नकारात्मक पब्लिसिटी करण्याची धमकी दिली जाते आणि ही बाब सिनेउद्योगासाठी अत्यंत घातक आहे.

यामीने एका लांब पोस्टमध्ये लिहिलेय, अभिनय आणि चित्रपटासाठी आता पैशांचा आधार देऊन, चुकीच्या ब्रँडिंग/प्रेस्टेज होऊ लागल्या आहेत. काही लोक जर पैसे नाही दिलेत तर नकारात्मक लेखन किंवा ट्रोलिंग सुरू करण्याची धमकी देतात, यावर तिने प्रहार करत कडक शब्दांत टीका केली.

यामीने स्पष्ट लिहिले की, आजकाल प्रामाणिक कामापेक्षा पैसे देऊन तयार केलेली हायप, प्लॅन केलेली निगेटिव्ह वृत्तं आणि कृत्रिम इमेज बनवण्यास जास्त महत्त्व दिले जात आहे. जर तुम्ही पैसे देत नसाल, तर मोठे भासवले जाणारे काही प्रोफेशनल ग्रुप्स चित्रपटाला मुद्दाम वाईट दाखवण्याचा प्रयत्न करतात. या सर्व पद्धती खंडणीसारख्याच आहेत.

चित्रपटाच्या मार्केटिंगच्या नावाखाली पैसे देण्याची ही तथाकथित प्रवृत्ती, चित्रपटासाठी चांगला ‘हायप’ तयार करण्यासाठी आहे. पैसे दिले नाहीत तर चित्रपटाविषयी निगेटिव्ह इमेज बनवल्या जातात, निगेटिव्ह गोष्टी लिहिल्या जातात, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या गोष्टी घडत राहतात. जोपर्यंत तुम्ही ‘त्यांना’ पैसे देत नाही तोपर्यंत, एक प्रकारची खंडणी वाटते. ही व्यवस्था सहजपणे अमलात आणली जाते, चित्रपट ‘हायप’ करायचा की दुस-या अभिनेत्याविरुद्ध/चित्रपटाविरुद्ध नकारात्मकता पसरवायची – ही बाब सिनेउद्योगाच्या भविष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे, असे तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news