नार्वेकरांनी मराठी भाषेची लक्तरे वेशीवर टांगली

शोक प्रस्ताव वाचताना अक्षम्य चुका, टीकेची झोड
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील एक महत्त्वाचे पद असलेले महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करताना मराठी भाषेची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली. त्यांनी शोक प्रस्तावाच्या वेळी तब्बल २६ चुका केल्या. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदावरील प्रमुख व्यक्तीने अशा प्रकारे मराठी प्रस्तावाचे वाचन केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे लिखित शोक प्रस्तावदेखील त्यांना नीट वाचता आला नाही. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हा मराठी भाषेचा अपमान असल्याची टीका होत आहे.

विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्तावाचे वाचन करताना मराठीचे चुकीचे शब्द वापरले. त्यांनी दिवंगत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबद्दलचा शोक प्रस्ताव वाचून दाखविताना तब्बल २६ चुका केल्या. विशेष म्हणजे या प्रस्तावात जे नमूद केले होते. त्यातील शब्दांच्या भावनेचा अक्षरश: चुराडा झाल्याचे त्यांच्या वाचनातून दिसून आले. आशा भोसले यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ असताना नार्वेकरांनी ते नाव दीनदयाळ असे वाचले.

रसिकांच्याऐवजी रेसिकांच्या, दुर्दम्य अशा शब्दाऐवजी दुर्दमय असा शब्दप्रयोग केला. एवढेच नव्हे तर साधा शृंगार शब्दाचा उच्चारही करता आला नाही. गांभीर्यपूर्वक ऐवजी गंभीरपूर्वक अशा शब्दउच्चार केला. सभागृहातील अध्यक्ष किंवा सभापती यांच्याविषयी टिपण्णी केल्यास हक्कभंग होतो. त्यामुळे त्या गंभीर चुकांवर सभागृहात कुणीही बोलले नाही. परंतु सोशल मीडियासह मराठी जाणकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली.

राज ठाकरे यांनीही
व्यक्त केला संताप
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेले मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून यांनी भेळ खाल्ली होती का? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

हेडमास्तरांनाच आता
शाळेत घालण्याची वेळ
विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर. पण हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लगावला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BREAKING: नांदेडमध्ये काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
01:48
Video thumbnail
BIG BREAKING:बार्शी रोडवरील ९७ पथदिवे २० वर्षांपासून बंद; ड्रीम प्रोजेक्ट दुर्लक्षित
02:52
Video thumbnail
BIG BREAKING : मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात;आरोपीकडून ६ दुचाकी जप्त
01:01
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
07:08
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
00:00
Video thumbnail
LIVE-महाराष्ट्र विधानसभा कामकाज 2026
03:29:40
Video thumbnail
BIG BREAKING: खासदारांचा ताफा अडवण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न; कार्यकर्त्यांचा रस्त्यावर उतरून एल्गार
03:48
Video thumbnail
BIG BREAKING : आजपासून राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात;उन्हाच्या तीव्रतेमुळे शासनाचा निर्णय
01:21
Video thumbnail
जळकोट तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; नद्यांना पूर, तलाव ओसंडले तर शेतीची प्रचंड दाणादाण!
02:21
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरमध्ये उघड्या डीपी आणि जीर्ण खांबांमुळे नागरिक धास्तावले
03:10
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्यापासून सुटका, अनेक गावांची बत्ती गुल
01:25
Video thumbnail
BIG BREAKING : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा १६ जागांवर विजय
02:00
Video thumbnail
Solapur|सोलापुरात कमळ फुललं; राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय!
00:53
Video thumbnail
Lakhnow|लखनऊमधील तीन मजली इमारतीला भीषण आग; १४ जणांचा मृत्यू
01:31
Video thumbnail
Latur|धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय
01:24

Latest news