26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या जागेबाबत रस्सीखेच सुरूच

नाशिकच्या जागेबाबत रस्सीखेच सुरूच

मुंबई : : महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान आमदार हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेवरून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी कमालीचे आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ ( हे देखील नाशिकच्या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी याआधी चार ते पाच वेळा ठाणे गाठले होते. आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे ठाण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘शुभ-दीप’ निवासस्थानी ते पोहोचले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR