निलंगा तालुक्यात ४ सोसायटी मतदारांचे अपहरण!

आ. संभाजी पाटील निलंगेकरांवर कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचा आरोप, अशोक पाटील निलंगेकरांसह पोलिस स्टेशनसमोर ठिय्या
निलंगा : प्रतिनिधी
लातूर जिल्हा बँकेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. ४ जागांवर निवडणूक बिनविरोध झाल्याने आता १५ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात निलंगा सोसायटी मतदारसंघात चुलती आणि पुतण्यात लढत सुरू आहे. कॉंग्रेसने अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सौ. संगीता पाटील निलंगेकर यांना तर भाजपने अरविंद पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली. येथे कॉंग्रेसने विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे विरोधी उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांनी मतदारांची पळवापळवी सुरू केली आहे. औराद शहाजानी भागातील ४ सोसायटी मतदारांसह ५ जणांचे पोलिसांच्या मदतीने आज अपहरण केले असून, यात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यांचा हात असून, या मतदारांना कर्नाटकच्या दिशेने पळवून नेल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केला. त्यांनी अशोकराव पाटील निलंगेकर आणि कार्यकर्त्यांसह औराद पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

निलंगा तालुक्यात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर यांची मनमानी सर्वश्रुत आहे. लातूर जिल्हा बँक निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला जिल्ह्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, प्रतिष्ठेची बनवलेल्या निलंगा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाची जागा निवडून आणण्यासाठी भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारांची पळवापळवी सुरू केल्याचा आरोप कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केला. जिल्हा बँकेच्या १५ जागांसाठी १५ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. परंतु त्या अगोदरच मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवून पळविले जात आहे. ही मंडळी सरळ लढतीतून निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे कट रचून मतदारांना पळविण्याचे काम करीत असून, आज औराद शहाजानी भागातील विनोद वीर, कमलाकर शिंदे, मुळे, गायकवाड हे ४ सोसायटीचे मतदार अशोकराव पाटील निलंगेकर यांना भेटले आणि त्यानंतर एमच १२ एन ०५०९ या गाडीमधून परत गावी निघाले होते. त्यावेळी त्यांची गाडी अडवून पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसविले आणि त्यांना कर्नाटकच्या दिशेने घेऊन गेल्याचा आरोप अभय साळुंके यांनी केला.

संभाजी पाटील
निलंगेकर यांचा कट
सोसायट्यांचे ४ मतदार पळवून नेण्याचा कट निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर आणि माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी रचला असून, पोलिसांच्या माध्यमातून मतदारांचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करीत अभय साळुंके यांनी संभाजी पाटील निलंगेकरांसह कटात सहभागी असलेल्या लोकांचे मोबाईल कॉल, सीडीआर तपासावेत, हा कट उघडकीस येईल. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

औराद शहाजानी पोलिस
स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
औराद शहाजानी पोलिसांच्या मदतीने सोसायट्यांच्या ४ मतदारांना कर्नाटकच्या दिशेने पळवून नेल्याचा आरोप करीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट औराद शहाजानी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून,मतदारांच्या अपहरणात हात असलेल्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह जे जे या अपहरणाच्या कटात सामील आहेत. त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही अभय साळुंके यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47

Latest news