महायुतीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरतेय

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांवर बेछूट आरोप करण्यात आले होते. त्या आरोपानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सहकार पॅनलचे उमेदवार विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी आकडेवारीतून सडेतोड उत्तर दिले. त्यामुळे विरोधी पॅनलची गोची झाली असून, ताळतंत्र गमावलेले विरोधक मुद्दे सोडून बोलायला लागले आहेत. विशेष म्हणजे विरोधी पॅनलचे नेते एकत्र येऊनही पत्रकार परिषदेत देण्यात येणा-या उत्तरांत एकवाक्यता दिसली नाही. यावरून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे बोलले जात आहे.

भाजपा महायुतीच्या नेत्यांनी रविवारी तडकाफडकी पत्रकार परिषद घेत आपला राग व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर, आमदार रमेश कराड, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अ‍ॅड. बळवंत जाधव, संतोष सोमवंशी यांची उपस्थिती होती.

या पत्रकार परिषदेत उपस्थित न केलेल्या प्रश्नांचे खुलासे आणि इशारे दिले गेले. विशेष म्हणजे महायुतीच्या सर्वच नेत्यांवर आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत, हे अगदी निक्षूण सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली. विनायकराव पाटील यांनी तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर व्यक्त केलेला राग धमकीवजाच होता. उपस्थित न केलेल्या प्रश्नांवर हे नेते काहींही कारण नसताना खुलासे करीत होते. या पत्रकार परिषदेत प्रमुख नेते विरोधी पॅनलवर बोलताना आपापसांतील मतभेद, हेवेदावे लपविण्याचाच केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जाताना महायुतीच्या नेत्यांची त्रेधातिरपट उडाली. यावेळी उत्तरे देताना त्यांना त्यांचा चिडचिडेपणा लपवता आला नाही, याचीच प्रचिती आली.

पत्रकार परिषदेच्या प्रारंभी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश सांगितला आणि निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आमच्या पॅनलची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगितले. मात्र, संपूर्ण पत्रकार परिषदेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनलचे नेते मुद्दे सोडून वैयक्तिक आरोप करताना अधिक दिसले.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47

Latest news