वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणा-या अनेक संस्थांवर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या पुरवठ्यात सहभागी असल्याचा दावा केलेल्या चिनी संशोधन संस्थेसह अनेक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.
अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, नियंत्रित क्षेपणास्त्र उपकरणे आणि तंत्रज्ञान याच्या प्रसारामध्ये सहभागी असलेल्या ५ संस्था आणि एका व्यक्तीवर कारवाई केली. यात विशेषत: बीजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमेशन फॉर मशीन बिल्ंिडग इंडस्ट्री या संस्थेचा समावेश आहे.
चीनची ही संस्था मोठ्या व्यासाच्या रॉकेट मोटर्सची चाचणी घेण्यासाठी उपकरणे खरेदी करण्याबाबत काम करत आहे. विशेषत: पाकिस्तानच्या शाहीन-३ आणि अबाबिलसह संभाव्य मोठ्या प्रणालींसाठी ही कंपनी मदत करत असल्याचे अमेरिकेचे मत आहे. त्यामुळेच या आणि इतर काही कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली.