31 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरपानगावात होणार उद्या गौतम बुद्ध अस्थि प्रतिष्ठापणा

पानगावात होणार उद्या गौतम बुद्ध अस्थि प्रतिष्ठापणा

लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यस्मारक ट्रस्टच्या वतीने उद्या दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता गौतम बुद्ध यांच्या अस्थि प्रतिष्ठापणाचा तर दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती चैत्यस्मारक ट्रस्टचे संस्थापक व्ही. के. आचार्य यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

गौतम बुद्ध यांच्या अस्थि प्रतिष्ठापणा कुशिनगर भिक्कुसंघ मुख्य मंदीर उत्तर प्रदेश तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे धम्मदिक्षा देणारे भदंत चंद्रमणी यांचे शिष्य भंते अग्गमहापंडित ज्ञानेश्वर महास्थवीर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी भंते सागर महाथेरो, भिक्कुणी धम्मनयना, भंते महाविरो महाथेरो, भंते सुमेधजी नागसेन, भंते पंय्यातीस, भंते नागसेन बोधी, भंते धम्मबोधी हे धम्मदेसना देणार आहेत. यावेळी चंद्रचुड चव्हाण, गयागाई कसपटे, शिवाजी आचार्य, गोपिनाथ टकले, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मकरंद सावे, प्रशांत पाटील, धनंजय चव्हाण, गुलाब चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यस्मारक येथे डॉ. आंबेडकर यांच्या अस्थि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, प्रमोद जाधव, सर्जेराव मोरे, अनंतराव देशमुख, उमाकांत खलंग्रे, विजय देशमुख, डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांची उपस्थिती राहणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, रिपाइंचे राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, मागासवर्गीय सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अनंत लांडगे, माजी शिक्षण सभापती अशोक कांबळे, सुरेश लहाने, ईश्वर गुडे, ललीता कांबळे, संतोष नागरगोजे, सतीश भंडारे, डॉ. संजय हरिदास, रुपेश चक्रे यांची उपस्थिती राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR