40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार कोण?

पुणे लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार कोण?

पुणे: प्रतिनिधी
पुणे लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार म्हणून पक्षाचे माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे आणि त्यावर लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनेकांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक, रा. स्व. संघाचे सुनील देवधर, माजी खासदार संजय काकडे आदींचा समावेश आहे, पण पक्षनेतृत्वाने मोहोळ यांना संधी दिली. देवधर यांनी गेल्या काही महिन्यांपासून कामास सुरुवात केली होती ती उमेदवारी मिळेल यादृष्टीने पण त्यांच्या पदरात निराशा आली. पक्षामध्ये संपर्क आणि एकूणच शहराशी निगडीत असणा-या विविध समस्या याबाबत पुरेसा संपर्क नसल्याचे समजते त्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी मिळाली नसावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोहोळ यांचा आणि राज्यसभा सदस्य प्रा. मेधा कुलकर्णी यांचा मतदारसंघ एकच म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघ होय. एकाच मतदारसंघात पक्षाने संधी दिली आहे त्याबाबत चर्चा सुरू आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शहर आणि जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे त्याचे प्रतिबिंब निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे.

तर दुस-­या बाजूला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा अनेक वर्षे काँग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे पुण्याच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असले तरी कोणाला संधी मिळणार आणि महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल असा उमेदवार दिला जाईल अशी चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR