लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. ३१ मे रोजी शहरातील अंबाजोगाई रोडवरील पु. अहिल्यादेवी होळकर चौकातील पु. अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धनगर सकल समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, अॅड. अण्णाराव पाटील, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, लातूर मनपाचे स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, सभागृह नेते विजयकुमार साबदे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्र.ा. डॉ. शिवाजी जवळगेकर, पंचायत समिती सभापती बैले, अॅड. दीपक सूळ, विष्णू धायगुडे, पवन सोलंकर, संभाजी सुळ, एकनाथ पाटील, प्रवीण कांबळे, राजपाल भंडे, प्रा. वाघमारे, बंडू किसवे, यशवंत वाडीकर, शिवाजी कांबळे, प्रा. सिद्धराम कठारे, मदन धुमाळ, शिंदे, बंडगर, घोडके, चंद्रकांत धायगुडे, बैकरे, बनसोडे यांच्यासह सकल धनगर समाज पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी रात्री १२ वाजता अंबाजोगाई रोडवरील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिषबाजी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार करणा-या घोषणा देण्यात आल्या. युवकांनी जल्लोश केला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे आभार
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे सकल धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करुन त्यांचा शाळ, श्रीफळ, घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला.
















