लातूर : सुनिता महेंद्रसिंग बावरी (रा. संजय नगर) यांनी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, विजयसिंग महेंद्रसिंग बावरी (वय २६ वर्ष रा. संजय नगर लातूर) हा घरातुन कपड्याची बॅग भरुन मी पुणे येथे जातो म्हणुन घरातुन निघुन गेला होता.
दुस-या दिवशी आम्ही त्याचे मोबाइलवर फोन केला असता त्याचा फोन लागला नाही. त्यामुळी आम्ही त्याचे सासरवाडीत फोन करुन विचारले असता त्याचे ससारवाडीतील लोकांनीही तो तेथेपण आला नसल्याचे सांगितले. मी माझे मुलाचा आज पावेतो शोध घेवून ही तो मिळुन आला नसल्याने माझे मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी डांबून ठेवण्याचे उदेशाने पळवुन नेले आहे. माझ्या बेपत्ता मुलाचा शोध घेउन मला मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
















