पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनधारकांचा संताप

लातूर : प्रतिनिधी
मोठा गाजावाजा करत शासनाने दर दोन महिन्याला दुस-या मंगळवारी  पेन्शन धारकाच्या समस्याचे समाधान करण्यासाठी पेन्शन अदालत  आयोजित करण्याचे शासन आदेश काढले. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर पेन्शन धारकाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी दर दोन महिन्यांनी पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. त्यानुसार १४ जुलै  रोजी पेन्शन अदालत पीठासन अधिका-याच्या  अनुपस्थित झाली. पेन्शनधारकांच्या संतापाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.
पेन्शन अदालतीसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपमुख्यकार्यकारी अधिकारी  व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणे बंधनकारक असताना पेन्शन अदालतीसाठी बरेच अधिकारी व विभागप्रमुख अनुपस्थित होते. त्यामुळे प्रत्येक पेन्शन अदालतमध्ये तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा तसेच प्रलंबित राहत आहेत. त्या प्रश्नावर थातूरमातूर उत्तर देऊन पेन्शन अदालतचा सोपस्कार पूर्ण केला जात आहे, असा आरोप करून पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनधारकाने संताप व्यक्त केला. जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतन वाढ देणे, वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करणे, निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजूर करणे, पेन्शनधारकांना गट विमा व भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ देणे, पेन्शनचे प्रस्ताव मंजूर करणे, सुधारित पेन्शनचे प्रस्ताव मंजूर करणे, नव्याने पुन्हा वेतन निश्चिती केलेल्यांचे सेवा पुस्तिका पडताळणी करणे, प्रवास देयके, अंशराशीकरण व उपदानाची रक्कम वेळेत मिळणे, ही रक्कम मिळण्याच्या अगोदरच अंशराशीकरण रक्कम कपात करणे अशा अनेक  प्रश्नाचा भडीमार करून पेन्शन धारकांनी अधिका-यांना धारेवर धरले.
पेन्शन अदालतीसाठी प्राथमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी प्रमोद पवार, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हिरागिर गिरी, अधीक्षक चव्हाण साहेब, सामान्य प्रशासन विभागाचे संदीप सोमवंशी, मनीषा चामे, कनिष्ठ अधिकारी बिरादार, तसेच श्रीमती मारकवाड, श्री सावनगीरकर, खोकले, विश्वजीत शृंगारे, डांगे इत्यादी उपस्थित होते. तर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस  युवराज घंटे, कार्याध्यक्ष लक्ष्मण दावणकर, उपाध्यक्ष रमाकांत, जाधव डी.सी. गायकवाड,अल्लाबक्ष शेख,जनक पवार, बालासाहेब हांडे, ,जी एन  बिराजदार, धोंडदेव,उकरंडे बालाजी उचेकर, हसमु शेख, दगडू शेख ,करीम बागवान बालाजी येळीकर, बालाजी शिंदे, रामकिशन सूर्यवंशी, खानापुरे सर,रवींद्र शिंदे, रामेश्वर कदम, शिरुरे, पवार, बिभीषण झेंडे, भंडारे इत्यादी अनेक पेन्शनर बहुसंख्येने उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news