२ किलो, १०० ग्रॅम गांजा जप्त

लातूर : प्रतिनिधी
शहरातील कुष्टधाममध्ये स्थानिक गुन्हे शाखेने दि. १४ जुलै रोजी अचानक धाड टाकली. त्यात तब्ब्ल २ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीही वाढत चालली आहे. वाढते अवैध धंदे आणि गुन्हेगारवर वचक बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे ही मोठी कारवाई केली आहे.
शहरातील कुष्टधाम परिसर म्हणजे गांजाचा अड्डाच बनला आहे. या परिसरात गांजा खरेदी करण्यासाठी तरुणांची नेहमीच वर्दळ असते, दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कुष्टधाममधील एका घरावर धाड टाकली असता एकजण घरातूनच गांजाची विक्री करत असताना दिसला, मात्र पोलीस आल्या लक्षात येताच मुद्देमाल सोडून आरोपी फरार झाला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि महसूल अधिकारी यांच्यामार्फत पंचनामा करून मुद्देमाल सील करून जप्त करण्यात आला आहे.
शहराच्या पुर्व भागात गांजा, देशी दारु, मटका, अशा  प्रकारचे सर्वाधिक अवैध धंदे चालतात. या अवैध धंद्यांमुळे या परिसरात गुन्हेगारीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. संजयनगर परिसरात घराघरातून अवैध देशी दारुची विक्री होत आहे. त्यामुळे या भागातील तरुण मोठ्या प्रमाणात देशी दारुच्या आहारी गेले आहेत. काही जणांनी अगदी तारुण्यात या जगाचा निरोप घेतला आहे. अवैध देशी दारुचा व्यवसाय करणारे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे गरीब नागरिक त्यांच्या विरोधात तोंड उघडत नाहीत आणि पोलीसही काही करीत नाहीत. त्यामुळे या परिसरातील तरुण पिढी बरबाद होत आहे.
चक्क महिलाच दारू ढोसून रस्त्यावर पडली 
दोन दिवसांपूर्वी संजयनगरच्या कमानीजवळ चक्क एक महिला दाुर डोसून रस्त्यावर पडली होती. तिथे बघ्याची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रभागातील एका नगरसेवकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले आणि त्या महिलेस रुग्णालयात पोहोचवले. त्यानंतर पोलिसांनी या भागातील अवैध देशी दारुचा व्यवसाय बंद पाडला. हे त्या दिवसापूरतेच झाले. संजयनगर परिसरात कोण अवैध देशी  दारु विकतो, हे पोलिसांना माहिती असूनही त्यांच्यावर कायमस्वरुपी कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे देशी दारुची अवैद्य विक्री कायम सुरुच राहाते, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news