34.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयप्रज्ञासिंह ठाकूर यांना कोर्टाने फटकारले

प्रज्ञासिंह ठाकूर यांना कोर्टाने फटकारले

कोर्टात हजर राहात नसल्याने नाराजी
मुंबई : प्रतिनिधी
विशेष एएनआय न्यायालयाने पुन्हा एकदा भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना फटकारले आहे. वारंवार कोर्टाने बजावूनदेखील प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहात नाहीत. या प्रकरणी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंटदेखील जारी केले. प्रज्ञासिंह ठाकूर सप्टेंबर २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

विशेष एनआयए न्यायालयाने मुंबई एनआयए टीमला भोपाळ येथील एनआयए टीमसोबत संपर्क करुन प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रकृतीची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वैद्यकीय अहवालाच्या आधारे न्यायालयाने आज त्यांना सूट दिली. प्रज्ञासिंह ठाकूर वारंवार आरोग्याचे कारण देत आहेत. त्यामुळे एनआयए टीम थेट प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या घरी जाणार आहे. सीआरपीसी ३१३ अंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी त्याची अनुपस्थिती न्यायालयीन कामकाजात अडथळा आणत आहे आणि खटल्याला विलंब करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलवर बसवलेल्या स्फोटक यंत्राच्या स्फोटात ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR