27.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeमनोरंजनप्रदर्शनाआधीच ‘धुरंधर २’चा बोलबाला; कमावले कोट्यवधी

प्रदर्शनाआधीच ‘धुरंधर २’चा बोलबाला; कमावले कोट्यवधी

मुंबई : प्रतिनिधी
रणवीर सिंहच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘धुरंधर २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच त्याने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. पेड प्रिव् ूजच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर २’ने पेड प्रिव् ूजच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास १ लाख ४२ हजार तिकिटांची विक्री केली आहे. त्यातून या चित्रपटाने आतापर्यंत ८.८३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे एकूण ६६८४ शोज असून त्यापैकी ६४५७ शोज हिंदी भाषेत आहेत.

हिंदी भाषेत या चित्रपटाचे जवळपास १ लाख ३५ हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर ब्लॉक सीट्ससोबतच या चित्रपटाने १३.२५कोटी रुपये कमावले आहेत. ‘धुरंधर २’ हा चित्रपट येत्या ९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाला १० दिवस शिल्लक असतानाच इतकी कमाई झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR