फडणवीस जिथे आहेत तिथेच आवश्यक

बीड : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावी नेतृत्व आहे. मी त्यांच्यासोबत गेली २५ वर्षे काम करत आहे. ते आज ज्या पदावर आहेत, तिथून अधिक मोठे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे; पण सध्या ते जिथे आहेत तिथेच राज्याला त्यांची गरज आहे, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान करायचे हे संघ किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: संजय राऊत यांनाच सांगितले असावे, त्याशिवाय ते एवढ्या आत्मविश्वासाने कसे बोलू शकतात? असा टोला पंकजा मुंडे यांनी राऊतांना लगावला आहे. तर मराठा आरक्षणसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांशी दर दोन तासांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेत आहे. संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला कसा न्याय देता येईल, यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे.

देशातील शेतकरी आनंदी
पंकजा मुंडे म्हणाल्या की, देशात गेल्या १० वर्षांत देशात रस्ते, हायवे, मेट्रो आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योग उभे राहत असून शेतकरी आनंदी आहे. तसेच लखपती दीदी आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांमधून महिलांचे सबलीकरण होत असून देश एका सकारात्मक प्रवासाकडे निघाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल रात्रीचे बातमीपत्र 03.09.26
22:04
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 03.09.26
28:03
Video thumbnail
BIG BREAKING | वसमतमध्ये २८८ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; उपविभागीय कार्यालयासमोर अंत्यसंस्कार
01:02
Video thumbnail
BIG BREAKING | जांब बुद्रुकमध्ये कडकडीत बंद, नांदेड–बिदर महामार्गावर रास्ता रोको
00:54
Video thumbnail
BIG BREAKING | तुळजापूर–नळदुर्ग मार्ग रोखला; मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
00:53
Video thumbnail
BREAKING | जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लातूरमधील शाळा-महाविद्यालये बंद
02:46
Video thumbnail
BIG BREAKING | औशात मराठा बांधव आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
02:52
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल दुपारचे बातमीपत्र 03.09.26
16:47
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; चार तालुके बंद, उद्या संपूर्ण जिल्हा बंद
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | मराठ्यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ केली कडकडीत बंद; गंज गोलाईत शुकशुकाट
04:25
Video thumbnail
BREAKING | मराठा आरक्षणासाठी लातूर बंद! सकाळपासूनच मराठा बांधव रस्त्यावर
04:01
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी उमरगा कडकडीत बंद; मुस्लिम समाजाचाही उत्स्फूर्त पाठिंबा
02:12
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली कथित देहव्यापाराचा पर्दाफाश; 7 महिलांची सुटका
00:54
Video thumbnail
Nanded Maratha Protest|नांदेडमध्ये मराठा आंदोलनाचा एल्गार! चार प्रमुख महामार्ग आंदोलकांनी रोखले
04:20
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 01.09.26
20:37

Latest news