लातूर : प्रतिनिधी
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी दि. २३ सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक, युवती व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून बंजारा समाजाच्या मोर्चास प्रारंभ झाला. मेन रोडने मोर्चा निधाला. डॉ. आंबेडकर पार्क, लोकमान्य टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. मोर्चात सहभागी बहुसंख्य महिलांला बंजारा समाजा पारंपारिक पोषाखात सहभागी झाल्या होत्या. मोर्चेक-यांच्या हातात विविध घोषांचे फलक होते. डोक्यावर घातलेल्या टोपीवर ‘मी बंजारा’, असा मजकुर लिहिलेला होता.
आगामी काळात जर शासनाने गांभीर्याने बंजारा समाजाच्या मागण्याला लक्ष नाही घातले तर संपूर्ण समाज हा आझाद मैदान येथे ‘कोयता मोर्चा’ काढणार असल्याचे आपल्या भाषणात तीव्र, असा शब्दात मान्यवरकडून सरकारला सांगण्यात आले. या मोर्चामध्ये बापूराव राठोड, उत्तम पवार, दीपक राठोड, अशोक चव्हाण, सुरेश चव्हाण, संजय राठोड, सुरेश राठोड, महेश चव्हाण आदींची भाषणे झाली. बंजारा समाजाच्या महामोर्चामुळे मेनरोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. मोर्चादरम्यान घोषणांनी आसमंत दुमदुमले.