40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरबाळेत संतप्त नागरीकांचा ड्रेनेजच्या पाण्यावरून पीएचई कार्यालयात ठिय्या

बाळेत संतप्त नागरीकांचा ड्रेनेजच्या पाण्यावरून पीएचई कार्यालयात ठिय्या

सोलापूर: लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर महापालिकेत नागरी समस्यांवर चर्चा सुरू झाली. बाळे तोडकरी वस्ती येथील घरांमध्ये ड्रेनेज लाइनचे पाणी शिरत आहे. यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयात ठिय्या मांडला. ‘महापालिकेचा धिक्कार असो’ च्या घोषणा दिल्या.

तोडकर वस्ती भागातील नागरिक पालिकेत आले. या भागातील कार्यकर्ते राजू आलुरे, अल्पेश राउत म्हणाले, बाळे, केगाव भागात नागरी सुविधा पुरविण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तोडकर वस्ती भागातील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरते. नळाला ड्रेनेजचे पाणी येते. या घाण पाण्यात कसे राहायचे. घरात जेवण कसे करायचे असा सवाल महिलांनी विचारला .सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांना इथेबोलावून घ्या, अशी आक्रमक भूमिका यावेळी नागरिकांनी घेतली. यादरम्यान, चौबे दाखल झाले त्यांनी तत्काळ समस्या दूर करू असे आश्वासन दिले.

अधिकारी आणि नागरिकांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर नागरिक परतले.
सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे व इतर अधिकाऱ्यांनी तोडकर वस्ती येथे जाऊन समस्येची पाहणी केली. तातडीने येथील ड्रेनेजची समस्या सोडविण्यात येईल. आवश्यक ती कार्यवाही करण्याबरोबरच नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR