40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरबार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

सोलापूर- सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष .अ‍ॅड. सुरेश गायकवाड यांच्याकडून पदभार स्विकारला. सोलापूर बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस बार असोसिएशनचे बहुतांश सिनिअर आणि ज्युनिअर वकील बंधू भगिनी व मान्यवर ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आला. आणि सन २०२४-२५ सालाकरिता निवडून आलेल्या नविन पदाधिकाऱ्यांचे निकाल वाचून दाखवण्यात आले.

त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. अमित विश्वनाथ आळंगे, उपाध्यक्ष अ‍ॅड..व्ही. पी. शिंदे, सेक्रेटरी अ‍ॅड. मनोज पामूल, सहसेक्रेटरी अ‍ॅड. निदा सैफन आणि खजिनदार अ‍ॅड. विनयकुमार कटारे यांना अनुक्रमे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष अ‍ॅड. असीम बांगी, सेक्रेटरी अ‍ॅड. करण भोसले, सहसेक्रेटरी अ‍ॅड. अनिता रणशृंगारे आणि खजिनदार अ‍ॅड. अविनाश काळे यांनी पदभार सोपवून निवड पत्र दिले. तसेच बार असोसिएशन व उपस्थित सिनिअर व ज्युनिअर वकिलांच्यावतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सोलापूर प्रमुख जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदिपासिंह रजपूत, सोलापूर बारअसोसिएशनचे माजी अध्यक्षा अ‍ॅड. एम.बी. जोशी चिंचोळकर, म ह्याजी अध्यक्ष अ‍ॅड. सी.एम. सावंत, ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब देशमुख, अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यानी सर्व मतदार सभासदांचे आभार मानून आगामी वर्षभर विविध कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान, सेमिनार, वर्कशॉप आयोजन, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आयोजित करण्याबाबत मनोदय व्यक्त केला. खजिनदार अ‍ॅड. विनयकुमार कटारे यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR