27.5 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरभंडारवाडी प्रकल्पावरील १४ विद्युत मोटारी जप्त

भंडारवाडी प्रकल्पावरील १४ विद्युत मोटारी जप्त

रेणापूर :  प्रतिनिधी
तालुक्यावर  दुष्काळाची गडद छाया पसरली असुन तालुक्याला वरदान ठरलेल्या  भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याचा बेमुसार उपसा होत असल्याने  सध्या  प्रकल्पात  केवळ ११  टक्के पाणीसाठा आहे. जिल्हाधिका-यांनी प्रकल्पातील  पिण्यासाठी  आरक्षित केलेले असतानाही  प्रकल्पालगत असलेल्या शेतक-याकडून शेतीसाठी बेसुमार उपसा होत असल्याची  दखल घेत मंगळवार दि. २७ फेबुवारी रोजी पाटबंधारे , महसुल विभाग व नगरपंचायतीच्या  पथकाने  संयुक्त कार्यवाही करीत प्रकल्पातून पाणी उपसा करणा-या शेतक-याच्या १४ विद्युत  मोटारी ,चार  स्टार्टर डब्बे, चार  वायर बंड्डल व ७ पाईप, असे साहित्य जप्त केले .
रेणापूर तालुक्यातील जनतेसह, शेतक-यासाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातुन  रेणापूर शहर,पानगाव, खरोळा या मोठ्या गावासह निम्या  तालुक्याला  व  अंबाजोगाई तालुक्यातील कांही  गावांना  येथुनच पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी तालुक्यात व  रेणा  मध्यम प्रकल्पाच्यापाणलोट क्षेत्रात  दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पात पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या या प्रकल्पात गेल्या वर्षीचाच पाणी साठा आहे- सद्य स्थितीत प्रकल्पात केवळ ११  टक्के पाणी साठा शिल्लक आहे. तालुक्यातील छोटे-मोठे प्रकल्प नदी नाले कोरडे ठाक पडले आहेत . त्यामुळे दुष्काळाची छाया गडद दिसत आहे अशा प्ािरस्थितीत व भविष्यात होणा-या पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यानी या प्रकल्पातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित केले आहे
मात्र जिल्हाधिका-यांच्या आदेशाला न जुमानता या प्रकल्पातून पाणी प्रकल्पा लगत असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात सिंंचनासाठी  उपसा केला जात  आहे. वेळोवेळी पाणी उपसा करण्यावर संबंधीत प्रशासनाने निर्बंध घातले असतानाही काही शेतकरी पाणी उपसा करीत आहेत. याची दखल घेत मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी   भंडारवाडी , कामखेडा, पानगाव ,वालेवाडी या भागात संयुक्त कार्यवाही करीत  प्रकल्पातून पाणी उपसा करणा-या शेतक-याच्या   १४ विद्युत  मोटारी ,चार  स्टार्टर डब्बे, चार  वायर बंड्डल व ७ पाईप असे साहित्य जप्त केले. या पथकात पाटबंधारे विभाग क्र. २ चे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी,  स्थापत्य अभियंत्रिकी एस.टी .डबे  , तलाठी बालाजी साळी ,कनिष्ठ लिपिक पी .एल .वडजे, नगरपंचायतचे  पंप  ऑपरेटर एस .एस .बोडके आदी उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR