19.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रभिवंडीत तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

भिवंडीत तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

ठाणे : प्रतिनिधी
भिवंडी शहराची तहान भागवणारा व-हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेने शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. गुलाम मुस्तफा अन्सारी (१३), शेख साहील पीर मोहमद (१०) आणि दीलबर रजा शमशुल्ला (१२) (तिघेही रा. शांतीनगर, पिराणी पाडा) अशी बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही मुले भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील पिरानी पाडा परिसरातील वेगवेगळ्या कुटुंबात रहमत मदिना मस्जिदीजवळ राहत होते. तिघेही मित्र आहेत. दरम्यान बुधवारी दुपारी १ ते दीडच्या सुमारास हे तिघेही घराबाहेर खेळण्यासाठी निघाले होते. मात्र बराच वेळ होऊनही तिघेही घरी न परतल्याने तिघांच्याही कुटुंबीयांनी शांतीनगर पोलिस ठाणे गाठून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR