33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरमनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू यांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण

मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू यांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण

सोलापूर : श्री. जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर च्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग मध्ये २०१४ सालापासून तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निवड समितीने शासकीय नियमानुसार जाहीर प्रसिध्दी करणाद्वारे थेट मुलाखती घेवून निवड समितीने निवडलेले वैद्यकीय अधिकारी असून आरोग्य विभागात आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत नियुक्ती ठिकाणी उत्तम प्रकारे आरोग्य सेवा दिली आहे.

त्यांच्या सेवेला ८ वर्ष पूर्ण झाले. आरोग्य विभागात कार्यरत असताना कोरोना महामारी पहिल्या लाटेत तत्कालीन आयुक्त . दिपक तावरे व तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू यांची मुद्रा सनसिटी नागरी केंद्रासाठी कोरोनाचे कामकाज पार पाडण्यासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी-१ या पदाची नियुक्ती दिली आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू यांनी नियमानुसार जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रशिक्षण घेऊन कोरोनाचे कामकाज नागरी आरोग्य केंद्राचे कामकाज पार पाडले असताना विनाकारण वॉलचंद कॉलेज क्वारांर्टन सेंटरच्या कामाविषयी संबंध येत नसताना बेकायदेशीर चुकीच्या पध्दतीने नियमबा संबंध लावून तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर व सामान्य प्रशासन विभाग यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू यांची चौकशी न करता किंवा चौकशी समितीद्वारे अहवाल न मागवता व आरोग्य अधिकारी हे खाते प्रमुख असल्याने त्यांचे अभिप्राय न घेता वालचंद क्वारांटईन सेंटरच्या असंबंधित चुकीचे कारणाचा ठपका ठेवून पहिले लाटेचेच संपलेले कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दाखवून अचानकपणे दुसऱ्यांदा सेवा समाप्तीचा निर्णय लादला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कोरोना महामारीत महत्त्वाचे जबाबदारी पार पाडलेले वैद्यकीय

अधिकारी डॉ. पल्लोलू वाय. एच यांच्यावर अन्याय झाल्याने सदरचा निर्णय रद्द होऊन किंवा शिथील होऊन वैद्यकीय अधिकारी पदी पुर्ववत प्रथम नियुक्ती प्रमाणे पुर्व पदावर रुजु करण्यासाठी बेमुदत धरणे व साखळी उपोषण पुनम गेट जिल्हा परिषद, सोलापूर येथे समाज अध्यक्ष करेप्पा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली व श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ शहर व जिल्हा अध्यक्ष देवेंद्र भंडारे (मनपा सभागृह नेते) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नुतन अध्यक्ष सुधीर खरटमल , माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, मोची, मादिगा, मादगी, मादरु महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मारुती पंद्री (पिंपरी चिचंवड पुणे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार यांच्या जाहीर लेखी पाठिंबाने व श्री जांबमुनी मोची समाज युवक संघटना अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, सोलापूर शहर काँग्रेस कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, मोची समाज युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेक्रेटरी प्रा. नरसिंह आसादो वाबया म्हेत्रे हणमंतु सायबोळु, यल्लप्पा बुगले, मारुती जंगम, समाज सेक्रेटरी रवि म्हेत्रे, समाज खजिनदार लिंगराज पल्लोलू, मोची समाज पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर , श्री जांबमुनी मोची समाज शहर जनरल सेक्रेटरी, सिद्राम कामाठी , समाजातील मान्यवर नागेश माने,

आनंद पल्लोलू, मोची समाजाचे वक्ते व्यंकटेश भंडारे, मच्छिंद्र लोकेकर, मध्य रेल्वे सल्लागार सदस्य मातंग समाजाचे लखन गायकवाड, आम आदमी पक्षाचे महासचिव मल्लिकार्जुन पिल्लगेरी, आपचे युवक अध्यक्ष निलेश संगेपाग, भाजपचे शहर सेक्रेटरी भिमराव आसादे, रवि आसादे, सिद्राम म्हेत्रे, श्रीनिवास म्हेत्रे, परशुराम वाघमारे, अनिल भंडारे, जॉन जंगम, बोजप्पा म्हेत्रे, व्यंकटेश हणमापागोलू, लक्ष्मण म्हेत्रे, अंबादास पल्लोलू, विष्णु पल्लोलू इत्यादी सर्व मान्यवर व प्रमुख कार्यकर्ताच्या उपस्थित आंदोलन सुरु करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR