18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्यामनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले भलेमोठे दगड

मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले भलेमोठे दगड

 

मनाली : वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये सोलांग व्हॅलीमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. मध्यरात्री मुसळधार पावसानंतर अंजनी महादेव नाल्यात पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अचानक महापूर आला. त्यामुळे धुंडी ते पालचन आणि मनाली शहरापर्यंत पाणी पोहोचलं. पुरामुळे पुलावर मोठमोठे दगड आणि चिखल साचले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मनाली-लेह महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प आहे.

मनालीत ढगफुटीमुळे अंजनी महादेव नदी व आखरी नाल्याला पूर आला. या ढगफुटीमुळे बियास नदीलाही पूर आला. ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे पालचन येथे दोन घरे वाहून गेली. तसेच ढगफुटीमुळे लेह मनाली महामार्गाचेही नुकसान झाले. लेह मनाली हायवेवर बांधलेल्या पुलावर मोठे दगड पडले आहेत. पालचनजवळ रात्री मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग-००३ वर ढगफुटी झाली.

पालचन, रुआड आणि कुलंग गावात पुरामुळे गोंधळ उडाला होता. नदीतून येणा-या भयानक आवाजाने सगळेच घाबरले होते. पोलीस आणि प्रशासनाचे पथक मदतीसाठी पोहोचले आहे. ढगफुटीमुळे दोन घरे, एक पूल आणि वीज प्रकल्पाचे नुकसान झाले. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, नदीचा प्रवाह वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना नदीच्या नाल्यांकडे न जाण्याचा सल्ला दिला. तसेच सर्व वाहने अटल टनेल नॉर्टे बंदरातून रोहतांग पास मार्गे मनालीला पाठवली जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR