मराठवाड्यातही भाजपची बाजी

 

छ. संभाजीनगर, जालना, नांदेडमध्ये भाजप
परभणीत ठाकरे गटाची बाजी, लातुरात कॉंग्रेसची मुसंडी

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात एकूण पाच महापालिकांची निवडणूक झाली असून, या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३ महापालिकांवर झेंडा फडकविला तर ठाकरे गटाने कॉंग्रेसला सोबत घेऊन परभणीत विजय मिळविला आणि कॉंग्रेस पक्षाने लातूरचा गड राखत महापालिकेवर तिंरंगा फडकविला. महापालिकेच्या लढाईत दोन्ही शिवसेनेला मात्र बॅकफूटवर जावे लागले. कारण छ. संभाजीनगरमध्ये भाजपने बाजी मारत शिवसेनेला धक्का दिला. तेथे एमआयएम दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरला.

छत्रपती संभाजीनगरात एकूण ११५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला एकूण ५८ जागा मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही चांगलाच जोर लावला होता. मात्र, त्यांचीही निराशा झाली. शिवसेनेला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फक्त ६ जागा मिळाल्या. येथे दोन्ही शिवसेनेला मोठा धक्का बसला. येथे एमआयएम ३३ जागांवर विजय मिळवून दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरला तर वंचितला ४ जाग मिळाल्या. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी १ जागा जिंकता आली.

परभणी महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आघाडीला तब्बल ३७ जागांवर विजय मिळाला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २५ तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या. भाजपला १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ११ जागांवर विजय मिळवता आला. राज्यात भाजपची घोडदौड असली तरी परभणीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. परभणीत सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडी केली होती.

नांदेड महानगरपालिकेतही भाजपने ४५ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता काबीज केली. महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरांमधील वर्चस्व सिद्ध केल्याने नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे बॅनर लागले असून, यात राजकारणाच्या आखाड्यातील वस्ताद मालक असा उल्लेख आहे.

जालन्यात भाजपची
एकहाती सत्ता
जालना महापालिकेत भाजपाने दणदणीत यश संपादन केले आहे, यात भाजपाने ४१ जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने भाजपाला चांगलीच फाईट दिली. मात्र त्यांना १२ जागांवरच समाधान मानावे लागले. यासोबत काँग्रेस ९, एमआयएम २ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल राहिले. त्यामुळे येथे भाजपचाच महापौर होणार आहे.

लातुरात कॉंग्रेसचा
दणदणीत विजय
लातूर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत ४७ जागांवर विजय मिळवून महापालिकेवर तिरंगा फडकवला. यात काँग्रेस पक्षाने ४३, वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत सत्तेची स्वप्ने पाहणा-या भाजपला २२ जागांवरच समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला एकच जागा मिळाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news