36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरमराठवाड्यात महाविकास आघाडी विजयाचे शिखर गाठेल

मराठवाड्यात महाविकास आघाडी विजयाचे शिखर गाठेल

लातूर : प्रतिनिधी
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून भारताच्या या सार्वत्रीक लोकशाही निवडणूक प्रकीयेत सहभाग नोंदवला. आपल्या देशाची लोकशाही ही जगात सर्वश्रेष्ठ आहे, या लोकशाहीतल मतदान करुन लोकशाहीला अधिक बळकट दिले. मराठवाड्यात काँग्रेस महाविकास आघाडी विजयाचे शिखर गाठेल, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, ट्वेंटीवन अ‍ॅग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख, सिने अभिनेते रितेश विलासराव देशमुख, सौ. जेनिलिया रितेश देशमु, सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांनी दि. ७ मे रोजी सकाळी ७ सात वाजता बाभळगाव येथील मतदान केंद्र क्रमांक ३६८ ग्रामसचिवालय बाभळगाव मतदान केंद्रात ४१ लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची निवडणूकीसाठी मतदान केले.
यावेळी बोलतांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, महारा्ट्रात महाविकास आघाडी या लोकसभा निवडणूकीत मतदारांच्या आशीर्वादाने चांगले यश मिळवील मराठवाड्यात तर महाविकास आघाडी विजयाचे शिखर गाठेल असे सांगीतले. यावेळी बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, दयानंद शिक्षण संस्था बाभळगावचे सचिव श्याम देशमुख, बाभळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन महादेव जटाळ, व्हाईस चेअरमन शिवाजी जाधव, पोलीस पाटील मुक्त्ताराम पिटले, अविनाश देशमुख, तलाठी गोविंद तावरे, शिवलिंग थडकर, ग्रामसेवक शंकर भोसले, बंदेनवाज सय्यद आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी बाभळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे यांनी त्यांचे जन्मगाव शिरुर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे सकाळी मतदान केले. ग्रामदैवत नृसिंह व इतर मंदीरांत जाऊन नारळ फोडून आणि आई लक्ष्मीबाई व वडील बंडप्पा काळगे यांचे आर्शिवाद घेऊन मतदान केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR