लातूर : प्रतिनिधी
महात्मा फुले यांचा विचार देशातील पुरोगामी चळवळीचा पायाभूत आधार आहे. आज दुर्दैवाने प्रतिगामी शक्ती बहुजनांच्या महामानवाना हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या तत्वज्ञानाचा महात्मा फुले विरोध करत होते..तेच लोकं आज त्यांच्या विचारांचे विकृतीकरण करू पाहत आहेत.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, अज्ञान हे वंचित, शोषितांचे मुख्य कारण आहे आणि महात्मा फुलेनी सांगितले की, शिक्षणाशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही, ही मुख्य कारणे आपण लक्षात घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी केले. जी-२४ च्या वतीने दि. ११ एप्रिल रोजी सकाळी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील महात्मा फुले पुतळा येथे आयोजित आभिवादन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कुंभार बोलत होते. प्रारंभी जी-२४ ग्रुपच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन रावणराजे आत्राम यांनी केले. तर नरसिंग घोडके यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्राचार्य आर. डी. निटुरकर, प्रा. अनंत लांडगे, नगरसेवक प्रा. शिवाजी जवळगेकर, नगरसेवक अतिश चिकटे, माधव बावगे, पांडुरंग देडे, उपजिल्हाधिकारी अशोक पुरी, माळी समाज महासंघाचे भारत काळे, माया गोरे, दत्ता सोमवंशी, शरद झरे, नगरसेवक अफजल कुरेशी, लक्ष्मण कांबळे, अॅड. वसंतराव उगले, प्रा. सुधीर अनवले, सी. के. माळी, कॉ. विश्वभर भोसले, ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, नारायण कांबळे, शिरीष दिवेकर, मारोती माने, नामदेव घोडके, श्रीमती मंगल कांबळे, पांडुरंग अडसूळे, बरकत काझी, प्राचार्य सूर्यवंशी, प्राचार्य शिवाजी माडे, रिपाई नेते चंद्रकांत चिकटे, मोहन कांबळे सेलूकर, संग्राम वाघमारे आदिसह अनेक मन्यवरांची उपस्थिती होती.

