महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी जनजागृती 

लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरातील संत गोरोबा सोसायटी प्रभाग क्रमांक ३ येथे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वालंबी करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन अ‍ॅग्री लि. च्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत. प्रशिक्षणाबरोबरच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वालंबी करण्यासाठी स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी अशा योजनांची ही मदत होईल.
यावेळी रियाज शेख जिल्हा समन्वयक मिटकॉन कन्सल्टन्सी अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिंमिटेड, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी लक्ष्मीकांत कैले, व्यवसाय सुविधा केंद्र, आदित्य  देशमुख, तांत्रिक व्यवस्थापक फिल्ड ऑफिसर प्रतीक देशमुख यांनी उपस्थित  महिलांना शासनाच्या विविध उद्योग व स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती दिली. रियाज शेख यांनी उद्योग सुरू करण्यासाठी उपलब्ध अनुदान, कर्ज योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन, लागणारे कागदपत्रे व व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया असते या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले आणि उद्योजकता विकासाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे, महानगरपालिका स्थायी समितीचे सदस्य विकास कांबळे, काँग्रेसचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख  प्रवीण सूर्यवंशी  व विलासराव देशमुख फाउंडेशनचे समन्वयक गजानन बोयणे, सोशल प्लॅनर सोमनाथ कावळे तसेच संत गोरोबा सोसायटी प्रभाग क्रमांक ३ व परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या जनजागृती कार्यक्रमामुळे शासनाच्या उद्योगविषयक योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत  झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news