31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeलातूरमांजरा कारखाना येथे संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण 

मांजरा कारखाना येथे संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण 

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना विलासनगर ता. जि. लातूर येथे लातूर जिल्हा सहकारी बोर्ड व लातूर सहकार खाते यांच्या सहकार्याने व माजी मंत्री, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण वर्ग यांना सहकार शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना व लातूर जिल्हा सहकारी बोर्ड यांच्या वतीने तसेच सहकार खात्याच्या सहकार्याने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दि. १० व ११ एप्रिल रोजी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.  कारखान्याच्या सांस्कृतिक सभागृहात हे दोन दिवसीय शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोक काळे होते.
या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पी.आर. फडवणीस (विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर), ए. एस. शिंदे( माजी मुख्य अधिकारी महाराष्ट्र राज्य), एस. एस. देशमुख (जिल्हा सहकार विकास अधिकारी लातूर जिल्हा सहकारी बँक), सद्दाम शेख (तज्ज्ञ व्याख्याते), डॉ. आर.एन. सूर्यवंशी (प्राध्यापक कुमारस्वामी महाविद्यालय औसा), एस. बी. येळीकर (सहकार विकास अधिकारी लातूर जिल्हा सहकारी बोर्ड) यांनी विशेष मार्गदर्शन केले. संचालक, अधिकार, कर्मचारी यांच्या कामकाजातील समन्वय, तसेच वेळेचे प्रभावी नियोजन यावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर उपविधीतील विविध तरतुदी आणि तणाव व्यवस्थापन व व्यक्तिमत्व विकास या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच लेखापरीक्षण पूर्वतयारी, निकष व दोष दुरुस्ती यासंबंधी माहिती देण्यात आली. यासोबतच जीएसटी प्रणाली, टीडीएस आणि सहकारी साखर कारखान्यांसाठी आवश्यक असलेल्या विविध तरतुदींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रशिक्षण वर्गामध्ये कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरामुळे सहकारी संस्थांचे कामकाज अधिक परिणामकारक व पारदर्शक होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. शिबिरास कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई साहेब, ऊस पुरवठा कमिटीचे अध्यक्ष  कैलास पाटील व संचालक तात्यासाहेब देशमुख, सदाशिव कदम, धनराज दाताळ, शंकरराव बोळंगे,  अनिल दरकसे, दयानंद बिडवे, सचिन शिंदे,  ज्ञानेश्वर पवार, सुरेश चव्हाण, श्रीकृष्णा काळे, तानाजी जाधव, शत्रुघ्न पाटील, नवनाथ काळे,  निळकंठ बचाटे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR