25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeलातूरमांजरा कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतक-यांना १०० रुपयांचा अंतिम हप्ता अदा

मांजरा कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतक-यांना १०० रुपयांचा अंतिम हप्ता अदा

विलासनर : प्रतिनिधी
येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कारखान्याचे मार्गदर्शक व चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतक-यांना त्यांच्या खात्यावर १०० रुपयांचा अंतिम हप्ता जमा करण्यात आलेला आहे.  दसरा, दिवाळी सणानिमित्त कारखान्याकडून सभासदांना प्रतिभाग (शेअर्स ) ५० किलो साखर २५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने रोखीने शेती गट कार्यालयामध्ये १ ते १० ऑक्टोबरपर्यंत विक्री करण्यात येत आहे.  तसेच या सणासुदीच्या काळात सदरचा हप्ता मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एफआरपीपेक्षा १९५ रुपये अधिकचे  ऊस उत्पादक शेतक-यांना अदा 
केंद्र शासनाने गाळप  हंगाम २०२३-२४ साठीच्या उसासाठी निश्चित केलेल्या एफआरपी दरानुसार प्रत्यक्ष ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता कारखान्याची अंतिम एफआरपी रुपये २५०५ इतकी निश्चित झाली आहे, परंतु शेतक-यांच्या हिताचा नेहमीच विचार करणारे मांजरा परिवाराचे कुटुंब प्रमुख कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याच्या नफ्यातून एफआरपी पेक्षा प्रति मॅट्रिक टन रुपये १९५ इतकी अतिरिक्त रक्कम  शेतक-यांना देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कारखान्याकडून या अगोदर रुपये २६०० प्रति मॅट्रिक टन प्रमाणे ऊस उत्पादक शेतक-यांना अदा करण्यात आलेले आहेत व आता सणासुदीच्या काळात ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर प्रति टन १०० रुपये प्रमाणे वर्ग करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना दसरा व दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सवलतीच्या दराने वाटप  होणारी साखर सभासदांनी गट कार्यालयातून वेळेत घ्यावी, तसेच एफआरपी च्या  अंतिम १०० रुपये  हाप्त्यासाठी  आपले बँकेशी  संपर्क साधून दिवाळी दसरा सण आनंदात साजरा करावा, असे  आवाहन मांजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR