31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरमांजरा परिवारातील परंपरेला साजेसा उच्चांकी ऊसदर देण्याचा ट्वेन्टीवन शुगर्सचा निर्धार

मांजरा परिवारातील परंपरेला साजेसा उच्चांकी ऊसदर देण्याचा ट्वेन्टीवन शुगर्सचा निर्धार

लातूर : प्रतिनिधी
टवेन्टिवन शुगर्स लि. कारखान्याकडून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारातील मांजरा, विलास, रेणा, जागृती या कारखान्याच्या परंपरेला साजेसा ऊच्चांकी अंतीम ऊसदर देण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहीती राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

या अनुषंगाने मांजरा परीवारातील साखर कारखान्या प्रमाणे लातूरातील टवेन्टिवन शुगर्स लि. कारखान्याकडून विद्यमान गळीत हंगाम २०२३-२०२४ साठी गाळप झालेल्या ऊसाला ऊसदरा पोटी प्रतिटन २ हजार ५०० रूपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत. मांजरा परीवारातील साखर कारखाने कारखानदारीत अग्रगण्य आहेत. या साखर उदयोगाच्या समूहात आज मराठवाडा, विदर्भात अत्याधुनीक साखर कारखाना म्हणून टवेन्टिवन शुगर्स अल्पावधीत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नावारुपाला आला आहे.

ऊसउत्पादकांसाठी टवेन्टिवन शुगर्स ठरला आधार
लातूर जिल्ह्यासह परीसरातील तालुक्यातील ऊसउत्पादकांच्या ऊसाचे वेळेवर गाळप करणारा हक्काचा कारखाना त्यांना हवा होता. या सर्व ऊसउत्पादाकांच्या ऊसाचे वेळेवर गाळप करण्यासाठी टवेन्टिवन शुगर्स कारखाना महत्वाचा ठरला आहे. मागील वर्षी अतिरीक्त्त ऊसाचे ऊत्पादन झाले होते. ऊसउतपादकांचा ऊस गाळपावीना शिल्लक राहील असा प्रश्न निर्माण झाला होता. या काळात टवेन्टिवन शुगर्स,ने दिर्घकाळ गाळप हंगाम चालवून १२ लाखा मे. टन पेक्षा अधीकचे विक्रमी गाळप केले. या परीसरातील शेतक-यांना या कठीण काळात न्याय देण्याचे काम या काळात कारखान्याने केले. यामुळे परीसरातील सभासद व बिगर ऊसउत्पादक शेतक-यांसाठी हा कारखाना आधार ठरला आहे. या कारखान्यामुळे लातूर जिल्हा व परीसरातील ऊसउत्पादक शेतक-यांना एकप्रकारे कायमस्वरुपी आधार मिळाला आहे.

हंगामातील १ लाख मे. टन ऊस गाळपाच्या ऊबरठ्यावर
या गळीत हंगामात सुध्दा ऊसतोडणी यंत्रणेचा प्रभावी वापर करुन कारखाना दैनदीन गाळप वेगाने करीत आहे. या गळीत हंगाम टवेन्टिवन शुगर्स हंगामात ऊसाच्या १ लाख मे. टन गाळप ऊंबरठ्यावर आहे. गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला पहीला हप्ता २ हजार ५०० रूपये प्रति टन प्रमाणे देण्यात येणार असून आज पर्यंत गळीत झालेल्या ऊसाला प्रति टन प्रमाणे २ हजार ५०० रुपये ऊसदरापोटी अदा करण्यात येत आहेत. ऊस बीलाची ही रक्कम टवेन्टिवन शुगर्स ली. कडून संबंधीत ऊसउत्पादकांच्या बॅक खात्यावर जमा करण्यात आली आहे.

तीन गळीत हंगामातच विक्रमी कामगीरी
माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रियमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनाने व माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली टवेन्टिवन शुगर्सची ऊभारणी झाली आहे. अवघ्या तीन हंगामातच या कारखान्याची कामगीरी विक्रमी ठरली आहे. पहील्या हंगामापासूनच ऊसाचे विक्रमी सर्वाधीक गाळप केले, दर्जेदार साखरेचे ऊत्पादन केले, तांत्रीक कार्यक्षमतेचा चांगला वापर केला आहे. यामुळे तीन हंगामातील कामगीरीवरच कारखाना साखर उद्योगात अत्याधुनीक आणि अग्रगण्य कारखाना ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR