26.4 C
Latur
Friday, October 31, 2025
Homeलातूरमांजरा परिवाराने सहकारात संस्काराचे उत्तम बिजारोपण केले

मांजरा परिवाराने सहकारात संस्काराचे उत्तम बिजारोपण केले

वलांडी : प्रतिनिधी
सहकार म्हणजे संस्था नव्हे तर संस्कार आहे. विकासरत्न विलासराव देशमुख, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सहकारात संस्काराचे उत्तम बिजारोपण केल्यामुळेच लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था नूसत्या टिकल्या नाहीत तर या संस्थांनी राज्यस्तरावर नावलौकीकही मिळवला आहे. सहकारात मांजरा परिवानाने संस्काराचे बिजे रोवल्याचा लाभ सर्वांना मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अ‍ॅड अलाईड इंडस्ट्रिज लिमिटेडच्या १४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि. २८ ऑक्टोबर रोजी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते. यावेळी सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, जिल्हा बँक संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, बसवराज पाटील नागराळकर, यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, डी. एन. शेळके, मल्लिकार्जुन मानकरी, विठ्ठलराव माकणे, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, भगवानराव पाटील तळेगावकर, विजयकुमार पाटील, निवृत्तीराव कांबळे, मोईज शेख, शिवाजीराव केंद्रे, अभय साळुंखे, अभिजीत देशमुख, धनंजय देशमुख, दिलीपराव माने, प्रमोद जाधव, पृथ्वीराज शिरसाट, सचिन पाटील, व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, सूर्यकांत कर्वा, विठ्ठलराव पाटील, अ‍ॅड. किरण जाधव, संभाजीराव सूळ, हनुमंत जाधव, अनुप शेळके, अरविंद भातांब्रे, सोनू डगवाले, रामदास पवार, गणेश येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वांच्या सहकार्यामुळे जागृती कारखाना उभा राहिला आहे. जागृती कारखान्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, असे नमुद करुन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले,  लातूर जिल्हा बँक विविध बँकेना कर्ज देते त्यामुळे बँकेचा आलेख हा सतत चढत राहिलेला आहे. मला घडवण्यामध्ये दिलीपराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करत आहे. दिलीपराव देशमुख यांच्या सहवास आणि मार्गदर्शनामुळेच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यांच्यामुळेच लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळ राज्यात अग्रेसर आहे. देवणी तालुक्यातील जागृती कारखान्याने या परिसरात समृद्धी आणली आहे. विकासरत्न विलासराव  देशमुख यांनी विकासात दिलेले योगदान बहुमुल्य आहे. त्यांच्या विचारावरच दिलीपराव देशमुख यांची वाटचाल सुरु आहे. जागृती कारखान्याच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होतो. दिलीपराव देशमुख यांची सर्वांना सहकार्याची भूमिका असते. शेतक-यांनी चिंता करण्याची गरज नाही.
सहकार, शिक्षण आणि उद्योग या तीन क्षेत्रात लातूर जिल्ह्याला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. त्यासाठी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरणार आहे. सहकाराच्या क्षेत्रात मांजरा साखर परिवाराने सर्वसामान्यांमध्ये आर्थिक क्षमता निर्माण केली आहे. शेतक-यांचे जीवन अधिक सुखी आणि समृद्ध करण्यासाठी ईश्वराने दिलीपराव देशमुख यांना आणखी उदंड आयुष्य द्यावे, अशी प्रार्थनाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली.  यावेळी सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे ऊस पुरवठादार, ऊस तोडणी यंत्रचालकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बसवराज पाटील नागराळकर, अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळूंके, भगवानराव पाटील तळेगावकर, विठ्ठलराव माकणे, यशवंतराव पाटील, शिवाजी केंद्रे, डी.  एन. शेळके, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जागृती शुगर्सचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी केले.
प्रारंभी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आल.ा. मुख्य कार्यक्रमस्थळी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जागृती शुगरच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जागृती शुगर कर्मचारी संघटना आणि लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बंडाप्पा काळगे, गणपतराव बाजुळगे, राजकुमार पाटील, राजकुमार जाधव, सहदेव मस्के, मदन भिसे, दयानंद बिडवे, चांदपाशा इनामदार, जितेंद्र स्वामी, विलास पाटील, सचिन पाटील, अ‍ॅड. प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, अनंतराव देशमुख पृथ्वीराज सिरसाट, एल. बी. आवाळे, प्राचार्य रामलिंग मुळे, हरिराम कुलकर्णी यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR