31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची हिप्पळगाव सोसायटी संचालक मंडळाने घेतली भेट 

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची हिप्पळगाव सोसायटी संचालक मंडळाने घेतली भेट 

लातूर : प्रतिनिधी
शिरुरअनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या नूतन प्रशस्त इमारत व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उद्घाटन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व्हावे यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके यांच्या नेतृत्वाखाली हिप्पळगाव सोसायटीचे चेअरमन बापूराव माने, भागवत व्यंजने, रमेश सोनवणे, दिलीप गड्डीमे, नारायण कांबळे, रामदास भूसागरे, व्यंकट खांडेकर, साबदे, रमाकांत मुरुडकर, दत्ता पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी सभासद यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली.
यावेळी हिप्पळगाव विवीध कार्यकारी सोसायटीच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी  हिप्पळगाव शाखेच्या बँकेच्या नूतन  इमारतीची माहिती घेतली लवकरच बँकेच्या नूतन इमारतीचे व विकास सोसायटी हिप्पळगावच्या नूतन वास्तूचे उद्घाटन होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR