31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरमाढ्यात शेतक-याने कांद्याने बटन दाबून केले मतदान

माढ्यात शेतक-याने कांद्याने बटन दाबून केले मतदान

माढा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिस-या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. महाराष्ट्रात आज ११ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान एक शेतक-याचा व्हीडीओ तुफान व्हायरल होत आहे. या शेतक-याने मतदानासाठी आपल्यासोबत कांदा नेला होता. त्याने मशिनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा भाजपला रडवणार असे एकूण चित्र सध्या तरी दिसत आहे. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील शेतक-याचा कांद्याने मतदान करतानाचा व्हीडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सदर शेतक-याने कांद्याने बटन दाबून आपला राग भाजप सरकारवर व्यक्त केलेला आहे.

सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापा-यांनी आंदोलने केली होती. कांदा उत्पादक शेतक-यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असा दावा शेतकरी आणि व्यापारी वर्गाने केला होता. कांदा निर्यातीला परवानगी द्यावी यासाठी सतत भूमिका घेतली जात होती. तिस-या टप्प्यातील मतदानाआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे.

कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर कांद्याचे दरही घाऊक आणि किरकोळ बाजारात बदलले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक-याने इव्हीएम मशिनवर कांदा ठेवून भाजपला नाही तर तुतारीला मतदान केल्याचे दिसत आहे. शेतक-याचा हा व्हीडीओ तुफान चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR