36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी देखील मोठा सहभाग दर्शवला आहे. सकाळपासूनच उमेदवार थेट मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला हक्क बजावत आहेत. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे
तर लोकसभेच्या उमेदवार अजित पवार गटाच्या सौ. अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील दाम्पत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी देखील आज मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे बजावला मतदानाचा हक्क. त्यांच्यासह कन्या अंकिता पाटील ठाकरे, पत्नी भाग्यश्री पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनीही केले मतदान.

 

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे गावात जाऊन बजावला मतदानाचा हक्क

 

 

 

आमदार भरतशेठ गोगावले आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुषमाताई गोगावले यांनी आज खरवली मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह पत्नी प्रतिभा पवार, राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे आणि कन्या रेवती सुळे यांनी बारामती येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानानंतर पवार-सुळे कुटुंबीयांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात काटेवाडी येथे पत्नी आणि पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार व आई आशाताई पवार यांच्यासह मतदान केले.

यानंतर अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मतदान केल्याचा फोटो शेअर केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातील मतदान केंद्रावर मतदान केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR