22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरमिरची, मसाल्यासह किराणामालाचे दर स्थिर

मिरची, मसाल्यासह किराणामालाचे दर स्थिर

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात किरकोळ किराणा बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर आहेत. कडधान्य, डाळींसह मिरची, मसाल्याचे दर स्थिर आहेत. खाद्य तेलांचे दर गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याची माहिती किरणा व्यापा-यांनी दिली असून मिरची, मसाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
हरभरा डाळ ८० ते ८८, तूरडाळ १७० ते १८०, मूगडाळ १३० ते १४०, मसूरडाळ ९० ते १००, उडीद डाळ १४० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच कडधान्यांचे दर मटकी १२० ते १५०, चवळी ११० ते १२०, सोयाबीन ६० ते ८०, हरभरा ८० ते ८४, हिरवा मूग १३० ते १४०, साधा मसूर १०० ते १६०, बेळगावी मसूर २८०, हिरवा वाटाणा १०० ते १२०, पांढरा वाटाणा ११० ते १२०, राजमा १४० ते १६०, वाल २०० ते २४०, छोले १४० ते १६० किलो याप्रमाणे विकला जात आहे. यासह पोहे ५० ते ६०, रवा ४४, मैदा ४४, शाबू ७५ ते ८४, वरी ११० ते १२०, शेंगदाणे १३० ते १६०, साखर ४२ ते ४४ रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. तसेच तांदळाचे दर प्रतवारीनुसार ४८ ते १२० ते रुपये किलो याप्रमाणे असून, शाळू ४० ते ५६, ज्वारी ४०रुपये आणि गहू ३८ ते ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. खाद्यतेलांचे दर शेंगतेल १८५ ते २१०, सरकी १२० ते १२५, सूर्यफूल ११५ ते १२५, खोबरेल तेल २४० ते २८०, जेमिनी १२५, पामतेल १०५, तूप ६०० ते ७०० आणि डालडा १३० ते १६० रुपये किलो याप्रमाणे विक्री सुरू आहे.
मसाले दर 
खोबरे १४० ते १८०, धणे १६० ते २००, तीळ २२० ते २४०, खसखस १९०० ते २२००, जिरे ३८० ते ४४०, मोहरी १०० ते १२०, मेथी १०० ते १२०, बडीशेप ४२० ते ४८०, हाळकुंड २८० ते ३४० रुपये किलो आहेत. तर लवंग १५० ते १७०, डालचिनी ७० ते १४०, मिरे ८० ते १२०, ंिहग ८० ते १००, बदाम फूल १४० ते १८०, मसाले वेलदोडे १८० ते २२०, रामपत्री १८० ते २२०, नाकेश्वर ३००, त्रिफळ १००, तमालपत्री २०, धोंडफूल १००, शहाजिरे ९० ते १२०, जायपत्री ३०० ते ३५०, हिरवे वेलदोडे ३२० ते ४००, जायफळ १०० ते १२० रुपये सुंठ ८० ते १०० (१०० ग्रॅमचे दर).
मिरची दर 
केडीएल बेडगी ६५० ते ७२०, बेडगी ३२० ते ४२०, लवंगी २६० ते ३२०, गरुडा जवारी २४० ते ३००, संकेश्वरी १००० ते १२०० रुपये किलो आहेत.उन्हाळ्याचे दिवस असल्याने लातूरच्या बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR