मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट मोडवर

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञाताकडून धमकीचा मेल आला. या धमकीच्या मेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. यानंतर तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला. अज्ञाताविरोधात पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारच्या धमकीचे मेल किंवा फोन येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

स्थानिक पोलिस, बीडीडीएसच्या पथकाकडून विमानतळ परिसराची तपासणी केली जात आहे. यादरम्यान संशयास्पद काहीही न सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. कसून तपासणी केली जात आहे. मुंबई विमानतळावरून दररोज हजारोंच्या घरात विमानांचे उड्डाण होते.

लाखोंच्या घरात प्रवासी ये-जा करतात. देशातील महत्त्वाचे विमानतळ म्हणून मुंबई विमानतळाकडे बघितले जाते. यादरम्यानच धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. मेलमध्ये थेट मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेल करत ही धमकी देण्यात आली होती. ज्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली होती. ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोवरच आता पुन्हा अशाचप्रकारचा मेल आला.

यासोबतच दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या आणि मुंबईच्या महापौरांना धमकीचा मेल आला होता. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. अशाचप्रकारची धमकी पुण्याच्या महापौरांनाही देण्यात आली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nilesh Lanke On Election|"राजकारणात काहीही होऊ शकतं!" — निलेश लंकेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
00:44
Video thumbnail
Latur Accident News|अलगरवाडीजवळ मृत्यूचा थरार; तिहेरी अपघातात तिघांचा बळी!
00:29
Video thumbnail
Latur|गॅस महाग, लाकूड महाग;हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले!
02:17
Video thumbnail
Latur Accident|खंबाळवाडीजवळ भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले प्राण
01:01
Video thumbnail
Ambadas Danve On Devendra Fadnavis|मुख्यमंत्र्यांनी दिलेला बैल आजारीच!" दानवेंचा गंभीर आरोप
04:52
Video thumbnail
Latur|ठाकरे गटाच्या बैठकीतच राडा; व्यासपीठावर शिवसैनिक भिडले!
00:53
Video thumbnail
'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला कंगना रणौतची ग्लॅमरस हजेरी!
00:42
Video thumbnail
जेव्हा सचिन तेंडुलकर विमानातच क्रिकेट खेळू लागला...!
00:42
Video thumbnail
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण: अंबाबाई मंदिराच्या शिखरावर झळकणार अडीच कोटींचा सुवर्णकळस
00:43
Video thumbnail
Latur Accident|निटूरमध्ये भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
01:12
Video thumbnail
Latur Farmar News|पत्नीसोबत स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याला अखेर मिळाला बैल!
01:38
Video thumbnail
Latur -बसस्थानकात सोनसाखळी चोरणारी महिला काही तासांत जेरबंद! #marathilivenews #Latur #police
00:41
Video thumbnail
Bus Accident|उदगीर-अहमदपूर मार्गावर मोठा अपघात#marathilivenews #maharashtranews #breakingnews
01:18
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08

Latest news